श्रीमन्महासाधु श्री मोरया गोसावी श्री चिंतामणीमहाराज आणि श्री धरणीधरमहाराज देव चिंचवडकर यांची पदे

 

 

॥ श्री जयति गजानन प्रसन्न ॥

 ॥ श्री मंगलमूर्ती प्रसन्न ॥

धुपार्ती

॥ श्री गणेशाय नम: ॥

॥ श्री मोरया ॥

आदि अवतार तुझा अकळु क-हे पाठारी ब्र्हमकमंडलु गंगा । रहिवास तये तीरी ॥

स्नान पै केलिया हो ।  पाप-ताप निवारी मोरया दर्शन ॥ देवा मोरया दर्शन ॥

 

जन्म मरण पै दुरी जयदेवा मोरेश्वरा ॥१॥

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ध्रु. ॥

 

अहो सुंदर मस्तकी हो । मुकुट दिसे साजिरा विशाळ कर्णद्वयॆ ॥ कुंडलॆ मनोहर त्रिपुंड टिळक भाळीं ॥

अक्षता तेजस्वर प्रसन्न मुखकमल ॥ देवा प्रसन्न मुखकमल ॥

 

मस्तकीं दुर्वांकुर जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥२॥

 

अहो नयन निर्मळ हो ॥ अति भोवया सुरेख एकदंत शोभताहे ॥

जडिली रत्ने माणिक बरवी सोंड सरळ ॥

दिसती अलौकिक तांबुल शोभे मुखीं ॥ देवा तांबुल शोभे मुखीं ॥

 

अधर रंग सुरेख जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ३ ॥

 

चतुर्भुजमंडित हो शोभती आयुधें करीं । फरश कमळ अंकुश हो मोदक पात्रभरी ॥

अमृत फळ नागर सोंड शोभे तयावरी । मुषक वाहन तुझे ॥ देवा मुषक वाहन तुझे ॥ लाडु भक्षण करी ॥

 

जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ४ ॥

 

नवरत्न कंठी माळ ॥ यज्ञोपवीत सोज्वळ ताइत मिरवतसे। तेज ढाळ निर्मळ जाई जुई नागचाफे पुष्पहार परिमळ चंदन कस्तुरी हो । देवा चंदन कस्तुरी हो ॥ उटी घेऊन परिमळ ॥

 

जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ५ ॥

 

अहो प्रसन्न दिसे दोंद ॥ तयावरी नागबंध सर्वांगि सेंदुर हो ॥ वरि मिरवे सुगंध नाभिमंडळ सुरेख ॥

विद्या करिती आनंद कटिसुत्र शोभताहे ॥ मेखळा कटिबंध ॥

 

जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ६ ॥

 

सुकुमार जानु जंघा पवित्र चरण-कमळ वर्तुळाकार घोटी ॥ टाचा दिसे सोज्वळ पाउले काय वर्णू ॥ आंगुलिका सरळ नखि चंद्र मिरवतसे ॥ देवा नखि चंद्र मिरवतसे ॥ भ्रमर घेती परिमळ

 

जयदेवा मोरेश्वरा ।

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ७ ॥

 

अहो चरणी तोडर वाकी ॥अंदुनाद साजिरा रत्नसिंहासनि हो ॥ओवाळु विघ्नहरा देइल भुक्ति मुक्ति चुकतिल येरझारा ॥

गोसवी दास तुझा ॥ मोरया गोसवी दास तुझा ॥

 

ओवाळु विघ्नहरा जयदेवा मोरेश्वरा ॥

जय मंगलमुर्ती आरती चरणकमळा । ओवाळु प्राणज्योती जयदेवा मोरेश्वरा ॥ ८ ॥

Advertisements
Categories: Uncategorized

|| श्री महालक्ष्मी ध्यानम ||

॥ श्री ॥

|| श्री महालक्ष्मी ध्यानम ||

 

धृत्वा श्रीर्मातुलिंगं तदुपरि च

गदां खेटकं पानपत्रम

नागं लिंगं च योनिं शिरसि

धृतवती राजते हेमवर्णा ॥

 

आद्या शक्तिस्त्रिरुपा

त्रिगुणपरिवृता ब्रह्मणे हेतुभुता

विश्वाद्या सृष्टिकर्त्री मम

वसतु गृहे सर्वदा सुप्रसन्ना ॥

Categories: Uncategorized

हे जगन्माते !

हे जगन्माते ! अनंत अवकाशाला कवेत घेऊन चंद्र सुर्याचे आणि ग्रहनक्षत्रांचे तेजोगोल उजळविणारी तू , रस-रंग-गंधाचे गर्भ वाहणा-या मातीत खळाळती जळे खेळवून सर्जनाचे सुरंगी, सुगंधी आणि रसार्द महोत्सव निरंतर साजरे करणारी तू सृष्टीच्या संगोपनाचे आणि संरक्षणाचे दायित्व सकलांना समजावून सांगणारी तू, तसेच, नवसर्जनासाठी जीर्ण जडाचा संहार युगांताराच्या वेळी अटळ आणि अत्यावश्यक असल्याचे भान घडवणारी तू, संत सज्जनांना आणि सामान्य सत्त्वशीलांना अभयाचे आश्वासन देणारी तू, दुर्बलांना बल देणारी आणि सबलांच्या आतल्या-बाहेरच्या असुरांचे निग्रहाने निखंदन करणारी तू, निर्मल चारित्र्य आणि अविचल निष्ठा यांची राखण प्राणपणाने करणा-यांना आंतरिक सुखाचा महामंत्र देणारी तू, श्री जगादंबे, माझ्या ह्रुदयाच्या करवीरक्षेत्रात तू सदैव नांदत रहा. तिथे तुझे चरण धारण करण्यासाठी परिमळलेल्या गाभा-यात सत्त्वाचे सिंहासन मी सजवून सज्ज ठेवले आहे ! …Text taken from book by R C Dhere

Categories: Uncategorized

॥ श्री जयति गजानन प्रसन्न ॥


॥ श्री जयति गजानन प्रसन्न ॥

पिता माता बंधु , तुजविण असे कोण मजला ।
बहु मी अन्यायी , परी सकळ ही लाज तुजला ।
न जाणे मी काही, जप तप पुजा साधनविधी ।
कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती ॥१॥

असे मी तो वेडा , परि मज तुझा लाड कळला ।
कृतांताला भिना , इतर गणना काय मजला ।
समर्था विघ्नेशा , सुर असुर धाकेचि पळती ।
कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती ॥२॥

वळे ना ही जिव्हा , धड मज तुझे नावही न ये ।
धरावे त्वा हाती , अभय वरदा पुर्ण अभये ।
अनाथांच्या नाथा झडकरी करी आस पुरती ।
कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती ॥३॥

भुकेलो केव्हाचा , हृदय निष्ठुर न करि झणी ।
प्रसादाचा लाडू कवळ बरवा घाल वदनी ।
सदा ब्रह्मानंदी, मग तुझपुढे नाचत प्रिती ।
कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती ॥४॥

बहु बोलु काही , परम सुखदा मंगलनिधी ।
मला तारी आता, अति कठिण संसारजलधी ।
स्वभावे गोसावीसुत, करितसे हेचि विनती ।
कृपा दृष्टी पाहे शरण तुला आलो गणपती ॥५॥

Categories: Uncategorized

आवाहन !

आवाहन !
प्रिय मित्रहो ,
मी हा ब्लॉग सुरु करुन जास्त दिवस झाले नाहीत , तरीही एक विनंती करु इच्छितो. 

ब-याच दिवसांपासुन मी एक कॉइन सॉर्टिंग मशीनच्या शोधात आहे.
मला भारतीय नाणी वेगळी करणारे एखादे यंत्र करुन हवे आहे, ते ही अगदी थोडक्या खर्चात ! 

सोबत सर्व नाण्यांच्या DIAMETER देत आहे

 कोणाला काहितरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर जरुर संपर्क करा.

Categories: Uncategorized

माझी कविता !

लाटांमध्ये बुडुन गेलि, शंकराची पार्वती ।
आकांत जरि हा जीवघेणा, लोक सारे पाहती ॥

आणू वरि , कोणि म्हणाले, काय नुसते पाहता ।
सांत्वना माझी खरी पण, ये मला ना पोहता ॥

पांडित्य कोणा हवे अन काय त्याचि सार्थता ।
अरे जिथे वाहुन गेली, माणसातील आर्द्रता ॥

सामर्थ्यहि आले न कामा , अश्रु माझे सांडता ।
आसवे माझी मला , ना पाहता ये ना पुसतां ॥

आता कुठे कळली मला , या जीवनाची सत्यता ।
अश्रुच आहे सत्य, अन हास्य आहे मिथ्यता ॥

लागली आता पटु, उक्तितली त्या साक्षता ।
आहे प्रवाह स्थिर, अन काठ आहे वाहता ॥

Categories: Uncategorized

॥ श्री हनुमान प्रसन्न ॥

॥ श्री हनुमान प्रसन्न ॥
महारुद्र अवतार हा सुर्यवंशी ।
अनादिनाथा पूर्ण तारावयासि ।
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥

तनु शिवशक्ति असे पुर्ण ज्याची ।
किती भाग्य वर्णू त्या अंजनिचे ।
जिच्या भक्तिलागि असा बाळ झाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥

सुमित्रसुता लागली शक्ती जेव्हा ।
धरी रुप अक्राळविक्राळ तेव्हा ।
गिरि आणुनि शीघ्र तो उठविला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥

गिळायासि जाता तया भास्कराशी
तिथे राहु तो येउनी त्याजपाशी
तया चंडकिरणा मारिता तो पळाला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥

जगी भीम तो मारुति ब्रह्मचारी ।
समस्तापुढे तापसि निर्विकारी ।
नमु जावया लागिले मोक्षपंथा ।
नमस्कार माझा तया हनुमंता ॥

खरा ब्रह्मचारी मना ते विचारी ।
म्हणुनी तया भेटला रावणारी ।
दयासागरु भक्तिने गौरविला ।
नमस्कार माझा तया मारुतीला ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Categories: Uncategorized